
मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला उद्ध्वस्त केले. या उजव्या हाताच्या गोलंदाजाने आपल्या स्विंग आणि बाऊन्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 9 धावांत 5 बळी घेतले. मोहम्मद सिराजने बेडिंगहॅम आणि मार्को यानसन यांना आपल्या 8व्या षटकात बाद करून पाच बळी मिळवून दिले.
15 धावांत 6 फलंदाज बाद, दक्षिण आफ्रिकेची मोहम्मद सिराजसमोर शरणागती
मोहम्मद सिराजने केपटाऊनची वेगवान खेळपट्टी समजून घेतली आणि त्याचा पहिला बळी एडन मार्कराम ठरला. त्याच्या आऊट स्विंगवर मार्करामला जैस्वालने स्लिपमध्ये झेलबाद केले. यानंतर सिराजने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला गोलंदाजी करून आपले इरादे व्यक्त केले. टोनी डी जॉर्जीला बाद करून त्याने तिसरे यश संपादन केले. पण आपल्या 8व्या षटकात या वेगवान गोलंदाजाने प्रथम बेडिंगहॅम आणि नंतर यानसन यांना बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कंबरडे मोडले.
Knocked ‘em overrrr!
_ ‘
| | /#MohammedSiraj has every reason to celebrate, as he cleverly sets up #DeanElgar and gets the big fish! 💥Tune-in to #SAvIND 2nd Test
LIVE NOW | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/EGX6XxZsSu— Star Sports (@StarSportsIndia) January 3, 2024
मोहम्मद सिराज पाच विकेट घेतल्यानंतरही थांबला नाही. त्याने 9व्या षटकात विराणेची विकेटही घेतली. अशाप्रकारे, सिराजच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. सिराजने पहिल्यांदाच कसोटी डावात 6 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये एका डावात पाच बळी घेतल्यानंतर सिराजने आता दक्षिण आफ्रिकेत आपली छाप सोडली आहे.
The Moments Mohammad Siraj picks 5-Wicket haul against South Africa.
– Siraj, What a bowler..!!!! ⭐ pic.twitter.com/5QSOCpMHne
— CricketMAN2 (@ImTanujSingh) January 3, 2024
सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता आणि त्या मॅचमध्ये सिराजवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सेंच्युरियनची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजीसाठी चांगली होती मात्र सिराजला पहिल्या डावात 91 धावांत केवळ 2 बळी घेता आले. मात्र, आता सिराजने केपटाऊनमध्ये चमत्कार करून टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
