
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. गुरुवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करू दिली नाही. या सामन्यात दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, या सामन्यात तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर असे काही घडले की खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. परिस्थिती अशी होती की चौथ्या पंचाला बोलवावे लागले. वास्तविक, या सामन्यादरम्यान तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले.
AUS vs PAK : सामना सुरू होण्याची वाट पाहत होते खेळाडू, लिफ्टमध्ये अडकला अंपायर, मेलबर्नमध्ये घडले आश्चर्यकारक
पाकिस्तानने सहा गडी गमावून 194 धावा करत तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. पाकिस्तानचा संघ 264 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 54 धावांची आघाडी घेऊन उतरला. मात्र, त्यांना दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करता आली नाही आणि त्यांनी लंचपूर्वी दोन फलंदाज गमावले.
उपाहारानंतर दोन्ही संघ मैदानात आले होते आणि खेळ सुरू होणार होता. मात्र त्यानंतर पंच त्याच्या जागेवर नसल्याचे समोर आले. तपास सुरू केला असता तिसऱ्या पंचाची भूमिका बजावणारे रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकल्याचे आढळून आले. सर्वजण त्याची त्या ठिकाणी कधी पोहोचण्याची वाट पाहत होते. अशा स्थितीत सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या चौथ्या पंचाने जबाबदारी स्वीकारली आणि तिसरा पंच बसला असेल तिथे वरच्या मजल्यावर धावला. काही वेळाने सर्व काही ठीक झाले आणि मग सामना सुरू झाला.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली. उपाहारापूर्वी त्याने उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेनचे विकेट गमावले होते. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ख्वाजा शाहीन शाह आफ्रिदीचा बळी ठरला. मीर हमजाने मार्नस लॅबुशेनला आपला बळी बनवले. उपाहारानंतर हमजाने वॉर्नरलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने ट्रॅव्हिस हेडलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
