
आत्तापर्यंत आपण वेगाची कमाल मर्यादा गाठणार्या कार, बाईक आणि ट्रेन संबंधी वाचले असेल. पण हिताची कंपनीने चीनच्या ग्यांगझू भागात उभारल्या जात असलेल्या गगनचुंबी इमारतीत जगातील सर्वाधिक वेगवान लिफ्ट बसविण्याचे काम हाती घेतले आहे. अर्थात ही सीटीएफ फायनान्शियल सेंटरची इमारत २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे. ९५ मजल्याच्या या इमारतीत ताशी ७२ किमीच्या वेगाने जाणारी लिफ्ट बसविली जाणार आहे. यामुळे पहिल्या मजल्यापासून ते ९५ मजल्यापर्यंतचे अंतर केवळ ४३ सेकंदात जाता येणार आहे.
