रोमहर्षक लढतीत कोलकत्ता विजयी

अबूधाबी- आयपीएलमधील रोमहर्षक लढतीत कोलकाता नाइट रायडर्सनी शेवटच्या षटकात उत्कदष्टय गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दोन धावानी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. शेवटच्याष षटकाम विनयकुमारेनदमदार गोलंदाजी केली; आतापर्यंतच्यास सामन्याटत पराभव न स्वीककारलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पहिल्यां दाच पराभव सहन करावा लागला आहे. लीनने डिविहलर्सच्या पकडलेल्यां झेलामुळे कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळविता आला.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सनी बेंगळुरूपुढे १५१ धावांचे आव्हान ठेवले. बेंगळुरूतर्फे चमकदार कामगिरी केली ती वरुण अॅरॉनने. त्याने १६ धावांत तीन फलंदाजांना बाद केले. प्रसंगी क्रिस लीन (४५) व जॅक कॅलिस (४३) यांनी फटकेबाजी केल्याने कोलकात्याला दीडशे धावांची मजल मारता आली. कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीर सलग तिस-या सामन्यात शुन्यावर बाद झाला. कॅलिस व लीन व यांनी दुस-या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करुन डाव सावरला.

या लढतीत शकीब अल हसनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू लायनला संधी देण्यात आली होती. या संधीचे त्याने सोने केले. कॅलिस-लायन जोडीने सावध सुरुवात करून धावांचा वेग वाढविला. मुथय्या मुरलीधरनला या जोडीने लावलेले षटकार टाळ्या वसूल करणारे होते. लायन ३२ धावांवर असताना सुदैवी ठरला. सीमारेषेवरील स्टार्कने लायनचा झेल टिपला. मात्र, त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने हा षटकार देण्यात आला. या जोडीने ६१ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. रॉबिन उथप्पाने (२२) फटकेबाजी केल्याने कोलकात्या धावगतीला वेग आला.

१५१ धावांचे आव्हान घेवून मैदनात उतरलेल्या बेंगळुरूची सुरूवात निराशाजनकच झाली. त्या‍चे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानतर विराट कोहली व युवराज सिंगने दमदार फलंदाजी करताना अर्धशतकाची भागदिारी केली. त्यानंतर कोहली ३१ धावा काढून बाद झाला. विजयासाठी १८ चेन्दुत २५ धावा हव्या होत्या. विजयला १० धावा कमी असताना युवराजही ३१ धावा काढून बाद झाला. विनयकुमारने शेवटच्या षटकात दमदार गोलंदाजी केली. लीनने डिविहलर्सच्या पकडलेल्या झेलामुळे कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळविता आला. त्यामुळे रोमहर्षक लढतीत कोलकाता नाइट रायडर्सला दोन धावांनी विजय मिळविता आला.

Leave a Comment