पैसे वाटपाचा संशय ;सेना -मनसेत राडा

मुंबई  – पैसे वाटपाच्या संशयावरून शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.  मुंबईत मतदानाच्या आदल्यारात्री पैसे वाटपाच्या संशयावरुन कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत मात्र  एक पोलिस शिपाई जखमी झाला आहे.

चेंबूरच्या महाराष्ट्रनगरमध्ये मनसेची गाडी पैसे वाटण्यासाठी जात असल्याच्या संशयावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेची गाडी अडवली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर थेट हाणामारीच झाली . त्यात दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. त्यामध्ये  विकास थोरवाले हा पोलिस शिपाई जखमी झाला आहे. राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्याविरोधात कलम ३०७, ३३२, १४३, १४९, ११४ अंतर्गत खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचा-याला मारहाण, दंगल माजवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.