आता भारतामध्ये गुगल क्रोमकास्ट एचडीएमआय फिचर्ड मल्टीमिडीया डिव्हाईस दाखल झाले आहे. अमेझॉन आणि ईबे या ऑनलाईन स्टोअर्समध्ये अवघ्या 3998 रुपयांमध्ये हा विक्रीसाठी उपलब्ध आहे. जुलै 2013 मध्ये गुगलने या क्रोमकास्टचे जगभरामध्ये अनावरण करण्यात आले होते.

गुगल क्रोमकास्ट हा एक मल्टीमिडीया प्लेअर आहे. हा डिव्हाईस एचडीएमआय व्दारे टीव्हीला जोडून आपण सर्व प्रकारचे ऑडियो आणि व्हिडीयो वायफाय कनेक्ट करून व्यवस्थितरित्या बघु शकतो. तसेच वायफायच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध यु टय़ुब , नेटफ्लिक्स, गुगल प्ले मुव्हीज आणि म्युझिक तसेच हुलु प्लस या सर्व्हिसचा आनंद आपण घेऊ शकतो. गुगल क्रोमकास्ट हा ऍन्ड्रॉईड, विंडोज आणि आयओएस प्लॅटफॉर्म असलेल्या सर्व स्मार्ट डिव्हाईसवर चालु शकतो.
क्रोमकास्ट डिव्हाईस अमेरिकेमध्ये लोकप्रिय असुन याला प्रचंड मागणी आहे. गुगल क्रोमकास्टच्या माध्यमातुन भारतातील मनोरंजनाच्या जगतात आपले वेगळे स्थान व ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. गुगल क्रोमकास्टला जागतीक बाजारपेठेत अमेझॉन निर्मीत फायर टिव्ही बॉक्सशी स्पर्धा करावी लागेल.