आमदार राम कदम फरारी

मुंबई  – मनसे आमदार राम कदम यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी, अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकणार होती, पण कदम हे फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.श्रीलंकेमधून गौतम बुध्दांचा अस्थी कलश आणला असून, भाविकांनी अस्थींचे दर्शन घेण्यासाठी घरी यावे. असे आवाहन करणारे फलक राम कदम यांनी विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये लावले.

या अस्थींबाबत भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता कदम आणि त्यांच्या समर्थकांनी या लोकांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती .तसेच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार केल्याच्या खोटय़ा गुह्यात अडकवू अशी धमकी दिल्याचा आरोपही कदम यांच्यावर करण्यात आला आहे. यासंधर्भात पार्कसाईट पोलिसचौकित गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेच्या शक्यतेने कदम फरार झाले आहेत. असे पोलिसांनी घोषीत केले आहे.