
कोईमतूर येथील किलोस्कर ब्रदर्स लिमिटेड या संपूर्ण महिला कामगार असलेल्या कारखान्याने मिशन महिला २० साठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये स्थान मिळविले आहे. पंप बनविणार्या या कंपनीतील महिला कामगारांनी १७.२५ सेकंदात पंप असेंबल करून दाखविण्याचे राष्ट्रीय रेकॉर्ड यशस्वी केल्यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने त्यांची नोंद घेतली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष महिला सशक्तीकरणासाठी समर्पित आहे. कंपनीचे प्रमुख डॉ. आर. व्ही .राजकुमार यांचा या निमित्ताने लिम्का कडून सन्नान करण्यात आला.
