दुबईत रियल इस्टेट क्षेत्रात २०१४ च्या तिमाहीत तब्बल १ अब्ज ६० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करून भारतीयांनी आघाडी घेतली असल्याचे दुबईच्या सरकारी संस्थेकडून जाहीर करण्यात आले आहे. दुसर्या क्रमांकावर ब्रिटन आहे तर तिसरा क्रमांक पाकिस्तानने पटकावला आहे.

दुबई भूमी आलेखन कार्यालयाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार दुबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात १११ देशांतील नागरिकांनी पहिल्या तिमाहीत गुंतवणूक केली आहे. या क्षेत्रात या काळात एकूण ९.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून ती गतवर्षीपेक्षा ५७ टक्क्यांनी अधिक आहे. यात भारतीयांचा वाटा १.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ५.८९ अब्ज दिरहाम इतका असून ब्रिटीशानी ३.१४ तर पाकिस्तान्यांनी २.४१ दिरहॅमची गुंतवणूक केली आहे.