मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार आटपून निघालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका अपघातात थोडक्यात बचावले. ही घटना मालाड व कांदिवलीमधील एका सिग्नलजवळ शनिवारी रात्री घडली. या अपघातात मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघातातून मुख्यमंत्री आणि त्यांचा चालक बचावला आहे.
काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री चव्हाण हे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील पश्चििम उपनगरात गेले होते. त्यावेळी मालाड व कांदिवलीमधील एका सिग्नलजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने दुसर्याा एका वाहनाला धडक दिली. या धडकेत मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा मागोमाग धडकला. तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या.
या विचीत्र अपघतातात मुख्यमंत्री चव्हाण यांच्या पायलट कारचा चालक जखमी झाला आहे.चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला नजीकच्या सूचक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण हे दुस-या कारमधून मंत्रालयात पोहचले.