डय़ुमिनीमुळे मिळाला दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजय

अबुधाबी- डेअरडेव्हिल्सचे सलामीवीर दिनेश कार्तीक आणि जेपी डय़ुमिनी यांच्या दमदार खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ४ विकेट्सनी शानदार विजय मिळविला. या रोमहर्षक सामन्यात विजयासाठी शेवटच्या ४ चेंडूवर ६ धावा हव्या असताना डयुमिनीने षटकार खेचत विजयश्री खेचून आणली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे सलमीवीर जॅक कॅलिस, गोतम गंभीर भोपळाही न फोडता बाद झाले. त्यामुळे त्यांची अवस्था २ बाद ११ अशी झाली होती. त्यांनतर आक्रमक फलंदाज रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांनी सावरले. या दोघांनी तिस-या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. अर्धशतकाकडे कूच करणारा मनीष पांडे ४८ धावा करून बाद झाला. मनीष बाद झाल्यावर उथप्पाला शकीब उल हसनची साथ मिळाली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावा जोडल्या. ४१ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ५५ धावा करून उथप्पा बाद झाला. यानंतर शकीबने २२ चेंडूंत ३० तर युसुफ पठाणने ८ चेंडूत ११ धावा केल्याने कोलकात्याने दीडशेचा टप्पा ओलांडला.

कोलकत्ताटचे १६७ धावांचे आव्हांन घेवून मैदानात उतरलेल्याण दिनेश कार्तिकने तुफानी खेळी केली. त्याानंतर जेपी डय़ुमिनीने दिल्ली डेअरडेव्हिल्सला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ४ विकेट्सनी शानदार विजय मिळवून दिला. कोलकाताने दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाला भक्कम आधार दिला तो कार्तिक आणि डय़ुमिनी जोडीने. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. ५६ धावांची खेळी करून कार्तिक बाद झाला. यानंतर डय़ुमिनीने सामन्याची सूत्रे हाती घेतली. शेवटच्या षटकात ४ चेंडूत ६ धावा हव्या असताना डय़ुमिनीने षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डय़ुमिनीने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५२ धावांची खेळी केली. डयुमिनीच्या दमदार खेळीमुळे कोलकत्तला विजय साकराता आला.

Leave a Comment