
पुणे – पुण्यातील मतदारांच्या याद्यांच्या घोळ प्रकरणी उपोषणला बसलेले भाजपाचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी उपोषण मागे घेतले आहे. शिरोळे उद्या केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. यामुळे पुण्यातील मतदार याद्यांच्या घोळाचे प्रकरण मिटण्याची चिन्हे आहेत.दरम्यान आज दुसर्या दिवशीही मतदानाचा हक्क न मिळालेल्या मतदारांनी फेरमतदानाची मागणी जिल्हाधिकार्यांसमोर लावून धरली.
