
रस्त्यावर जाण्यापूर्वी काही कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांनी विचारल्यावर ही कागदपत्रे दाखवली नाहीत, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), ड्रायव्हिंग लायसन्स (DL), विमा पॉलिसी याशिवाय प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आता हे पीयूसी प्रमाणपत्र काय आहे? सामान्य भाषेत याला पोल्युशन सर्टिफिकेट किंवा प्रदूषण प्रमाणपत्र असे म्हणतात. जर तुमच्याकडे ते नसेल, तर पोलिस तुमच्याकडून मोठा दंड आकारु शकतात.
PUC Certificate : संपली आहे का पीयूसीची मुदत ? अशाप्रकारे घरबसल्या तपासा, अन्यथा आकारला जाईल मोठा दंड
प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजे तुमचे वाहन कायदेशीररित्या परवानगी असलेल्या मर्यादेत प्रदूषण उत्सर्जित करत आहे. म्हणजे वाहनाची उत्सर्जन पातळी कायदेशीर मर्यादेत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलावे लागले आहे. सरकारने काही मर्यादा निश्चित केल्या असून, प्रदूषण प्रमाणपत्र त्या मर्यादेत राहण्यास मदत करते. प्रदूषण प्रमाणपत्र देण्यासाठी देशभरात उत्सर्जन चाचणी केंद्रे आहेत. सहसा ही केंद्रे पेट्रोल पंपावर असतात.
तुमच्या वाहनाकडे प्रदूषण प्रमाणपत्र आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला प्रदूषण प्रमाणपत्र तपासण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. प्रदूषण प्रमाणपत्रात किती वैधता शिल्लक आहे किंवा ते कालबाह्य झाले आहे की नाही हे तुम्हाला सहज कळेल. प्रदूषण प्रमाणपत्र नसेल तर दंड होण्याची शक्यता आहे.
दुचाकी किंवा इतर कोणत्याही वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र तपासण्यासाठी परिवहन पोर्टलवर जावे लागेल. जर तुम्हाला प्रदूषण प्रमाणपत्राची वैधता किंवा इतर माहिती जाणून घ्यायची असेल, तर या स्टेप्स फॉलो करा.
- PUC प्रमाणपत्राच्या https://puc.parivahan.gov.in/puc/ या लिंकवर जा,
- PUC प्रमाणपत्र विभागावर क्लिक करा.
- वाहन नोंदणी (RC) क्रमांक टाइप करा.
- आता चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक प्रविष्ट करा.
- कॅप्चा कोड टाकून पुढे जा.
- आता तुम्हाला प्रदूषण प्रमाणपत्राच्या वैधतेसह सर्व तपशील मिळतील.
तुम्ही नेक्स्टजेन mParivahan हे सरकारी अॅप वापरून प्रदूषण प्रमाणपत्र देखील तपासू शकता. येथे तुम्हाला अधिक वाहतूक सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत मिळते. प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास किती दंड वसूल केला जाईल, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
तुम्ही तुमच्या वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र ट्रॅफिक पोलिसांना दाखवण्यात अयशस्वी झाल्यास, दंड आकारला जाऊ शकतो. मोटार वाहन कायदा, 1988 अन्वये, प्रथमच प्रदूषण प्रमाणपत्र न दाखविल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. पुन्हा पकडले गेल्यास 1,500 रुपयांचा दंड आकारला जाईल.
