अमेरिकेतील रिटेल जायंट कंपनी वॉलमार्ट भारतात येत्या ४-५ वर्षात ५० होलसेल स्टोअर्स उघडणार असल्याचे वॉलमार्ट आशियाचे अध्यक्ष व सीईओ स्कॉट प्राझज यांनी जाहीर केले आहे. भारती ग्रुपबरोबर आक्टोबरमध्येच भागीदारी संपुष्टात आल्यानंतर कंपनीने आता स्वतःची स्टोअर सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील ग्राहक कॅश अॅन्ड कॅरी पद्धतीने खरेदी करणे अधिक पसंत करतात हे लक्षात घेऊन कंपनीने होलसेल दुकाने याच तत्त्वावर सुरू करण्याचे ठरविले आहे. भारतात कंपनी विस्तार योजना आखण्यास उत्सुक असल्याचेही स्कॉट यानी सांगितले. यूएस फॉरिन करप्ट प्रॅक्टीसेस अॅक्टचे उल्लंघन वॉलमार्ट कडून केले गेले होते मात्र भविष्यात पुन्हा असा प्रकार होणार नाही असेही आश्वासन कंपनीने दिले आहे. भारतातील स्टोअर्ससाठी परवाना, परमिटस, अन्न सुरक्षा या संबंधीचे सर्व करार कायद्यानुसारच केले जातील असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.