उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसघांतील उमेदवारावर खुनाचा गंभीर आरोप आहे. तया प्रकरणातील मुख्या आरोपी डॉ. पद्मसिंह पाटील यांना राष्ट्रआवादी काग्रेंसने उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे जामिनावर सुटून ते प्रचारही करीत आहेत. हाच न्याय भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आमच्या सुरेशदादा जैन यांना का नाही? असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्माुनाबाद येथील सभेप्रसंगी उपस्थित केला.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसघांतील महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे, आमदार नीलम गोर्हेे, सुभाष देसाई उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हमणाले, सुरेशदादा जैन साक्षीदार फोडू शकतात असे सांगत, त्यांना जामीन न देता तुरुंगात खितपत ठेवायचे आणि इकडे पद्मसिंह पाटील यांना जामीन मिळवून देवून निवडणूक रिंगणात उतरावयाचे हा प्रकार सरकार मस्तवाल झाल्याचे द्योतक आहे.
भैया देशमुख नावाचा एक कार्यकर्ता पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करतो. सत्ताधार्यां ना पाऊस पाडता येत नाही, हे त्या देशमुखाला उपमुख्यमंत्री प्रेमाने सांगू शकले असते. मात्र त्यांनी मस्तवाल भाषा वापरून टंचाईग्रस्तांचा अपमान केला. अशांना या निवडणुकीत धडा शिकवा, असेही ठाकरे यांनी स्पठष्टय केले.