गुगलने भारतातील लोकसभा निवडणुकांसाठी युजरला नो युवर कँडीडेट म्हणजे तुमचा उमेदवार जाणून घ्या या नावाचे नवे टूल उपलब्ध करून दिले आहे.या टूलच्या सहाय्याने युजर आपल्या भागातील उमेदवाराची सर्व माहिती मिळवू शकणार आहे. त्यात उमेदवाराच्या शिक्षणापासून संपत्तीपर्यंत तसेच सोशल मिडीयावर उमेदवार किती पोहोचला आहे हेही समजू शकणार आहे.
हे टूल वापरायला अत्यंत सोपे असून युजरने ज्या उमेदवाराची माहिती हवी त्या जागेचा पिनकोड टाईप करायचा आहे. तो माहिती नसेल तर संबंधित जागेचे नांव टाईप करायचे आहे. एंटर करताच सध्याच्या एमपीची सर्व माहिती युजरला मिळणार आहे. गुगल मॅपवर क्लिक करूनही ही माहिती मिळवता येणार आहे. मतदानाच्या तारखेच्या अगोदर १ आठवडा उमेदवाराची सर्व माहिती युजरला मिळू शकणार आहे. तसेच कोणत्या ठिकाणी कधी मतदान आहे याचीही माहिती दिली जाणार आहे.