पुणे – मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार्यांनी युतीत आले पाहिजे, नुस्ता बाहेरून पाठिंबा याला कांही अर्थ नाही असे भाजपचे अध्यक्ष राजनाथसिग यांनी पुण्यात भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत सुनावले आहे.त्यांनी कोणाचेही नांव घेतले नसले तरी त्यांचा रोख मनसेचे राज ठाकरे यांच्याकडेच होता असे स्पष्टपणे दिसून आले.
राजनाथसिंह म्हणाले, बाहेरून समर्थन याला कांही अर्थ नसतो. महाराष्ट्रातील कांही नेते मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देत असल्याचे समजले आहे. मात्र त्यांनी त्यासाठी युतीत आले पाहिजे किवा त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला पाहिजे. यावेळी गतवेळी समाजवादी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविणारे आणि आप पार्टीकडून तिकीट नाकारले गेलेले बांधकाम व्यावसायिक डी,एस.कुलकर्णी यांनी भाजपत प्रवेश केला.
मंगळवारी राजनाथसिंह यांनी परळी आणि निलंगा येथेही सभा घेतल्या. त्यात ते शरद पवारांवर तूटून पडले. राजनसिंसिह म्हणाले, महागाईसाठी शरद पवारच दोषी आहेत कारण त्यांनी चुकीची धोरणे आखली. गेल्या १० वर्षात त्यांच्या सरकारने ५ लाख कोटींचे घोटाळे केले आहेत. भाजप सत्तेवर आल्यास शेतकर्यांना पेरणीपूर्वीच पिक विमा दिला जाईल आणि नुकसान ग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जाईल तसेच बेरोजगारांना काम दिले जाईल असेही सांगितले.