मुंबई: देशातील ९१ लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी १० एप्रिलला मतदान होत आहे. या मतदानाची प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील १० मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. त्यामुळे या दहा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा मंगळवारी सांयकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. त्याामुळे प्रचारासाठी आज शेवटा दिवस असल्याने उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
महाराष्ट्रांत १० मतदारसंघात १० एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात विदर्भातील १० मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील दिग्गज नेते विदर्भाच्या दौ-यावर आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते आज विदर्भात प्रचार करणार आहेत.
त्या सोबतच देशात केंद्रशासित प्रदेशांसह १४ राज्यात ९१ जागांकरिता १० एप्रिल रोजी मतदान होणार होणार आहे. त्यामध्ये बिहारमधील सहा, छत्तीसगडमधील एक, हरियाणामधील १०, जम्मू आणि काश्मीर एक, झारखंड चार, केरळ २०, मध्यप्रदेश नउ , महाराष्ट्र दहा , ओरिसा दहा , उत्तर प्रदेश दहा, अंदमान आणि निकोबार एका, चंदीगड एकत, लक्षद्वीप एक, दिल्लीतील सात जागांवर मतदान होणार आहे. गुरुवारी देशातील विशेषता नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या ३७ जिल्ह्यात एकाच वेळेला मतदान होणार आहे. त्यामुळे पोलिस दलाला सर्वत्र पाचारण करण्यात आले आहे.