कर्करोगाच्या गोळ्या आणखी स्वस्त

केंद्र सरकारने औषध निर्मितीच्या पेटंटविषयक नियमांना मुरड घालून भारतामध्ये काही औषधे तयार करण्याची काही कंपन्यांना परवानगी दिल्यामुळे काही जीवरक्षक औषधे स्वस्त झाली आहेत. अमेरिकेतील बायर नावाची कंपनी मूत्रपिंडाच्या विकारावर आणि यकृताच्या कर्करोगावर नेक्झावार नावाची गोळी तयार करत असे. परंतु या कंपनीकडे या औषधाची निर्मिती करण्याची मक्तेदारी होती आणि त्यामुळे मनमानी किंमत लावून ही कंपनी भरपूर पैसा कमवत असे. नेक्झावार ही गोळी एवढी महाग होती की, महिनाभर ही गोळी घेतल्यास २ लाख ८४ हजार रुपये खर्च होत असत. भारत सरकारने या कंपनीच्या ही गोळी तयार करण्याचा विशेष हक्क काढून घेतला आणि ती तयार करण्याची परवानगी भारतातल्या नाटको ङ्गार्मा या कंपनीला दिली. या कंपनीने भारतात ही गोळी तयार करण्यास सुरुवात केली आणि २ लाख ८४ हजार रुपये दरमहा खर्च करावा लागणारी ही गोळी भारतात ८ हजार ८८० रुपयांना मिळायला लागली. 

म्हणजे अमेरिकेच्या त्या कंपनीने रुग्णांच्या मजबुरीचा ङ्गायदा घेऊन किती नङ्गा कमावला होता याची कल्पना येते. आता भारतामध्ये ही गोळी माङ्गक किंमतीत उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत जवळपास स्पर्धा सुरू झाली आहे. सिप्ला कंपनीने ही गोळी आता नाटको ङ्गार्मापेक्षाही स्वस्त केली आहे. तिच्यानुसार आता सिप्लाच्या या गोळ्या महिनाभर घेतल्या तर अवघे ६ हजार ८४० रुपये लागतात. सिप्ला कंपनीचे चेअरमन वाय.के. हमीद यांनी ही माहिती दिली. एवढी ही गोळी स्वस्त करून सुद्धा सिप्ला कंपनीला आवश्यक तेवढा नङ्गा राहतो, असे हमीद यांनी सांगितले. ही गोळी स्वस्त करावी अशी आपल्याला सरकारकडून काही सूचना नव्हती. मात्र रुग्णांना ती स्वस्तात देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा विचार आम्हीच केला आणि त्यातून ही गोळी एवढी स्वस्त झाली आहे. 

यापुढे जाऊन सिप्ला कंपनीने आता मेंदूच्या कर्करोगावर वापरल्या जाणार्‍या औषधांच्या किंमती सुद्धा कमी करण्याचे ठरवले आहे आणि आता या गोळ्या ज्या भावात विकल्या जातात त्याच्या ६० ते ७५ टक्के किंमतीला त्या विकाव्यात असे ठरवले आहे. सिप्ला ही भारतातली आघाडीची औषध निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीचा भारताच्या मार्केटमधला वाटा दुसर्‍या क्रमांकाचा आहे. या कंपनीत कर्करोग आणि अन्य गुंतागुंतीच्या विकारांवरील महागडी औषधे तयार केली जातात. त्या सर्व औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय सिप्लाने घेतला आहे. तिच्या नुसार मूत्रपिंडाच्या कर्करोगावर वापरली जाणारी सोरानिब ही गोळी आता ६ हजार ९९० रुपयांवरून १७१० रुपये एवढी स्वस्त करण्यात आली आहे. टिमोसाईड ही गोळी सुद्धा अशीच ७५ टक्के कमी किंमतीत दिली जाणार आहे. पूर्वी ही गोळी महिनाभर घेतली तर २० हजार रुपये लागत असत. आता मात्र कमी किंमतीमुळे हा खर्च केवळ ५ हजार रुपये येणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही