दिग्गज नेत्यांच्या सभाची रणधुमाळी

मुंबई: आगामी काळात होत असलेली लोकसभेची निवडणूक जवळ आल्या ने राज्यातील निवडणूक प्रचार सध्याक जोमाने सुरु आहे. विदर्भात १० तारखेला पहिल्याि टप्प़ययातील मतदान होत असल्या ने अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत. पहिल्या टप्यातील मतदानाच्या प्रचाराच्या शेवटी सगळेच राजकीय पक्ष आपली पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. नेत्यााच्यास सभेच्याी माध्ययमातून कलगीतुरा आता चांगलाच रंगला आहे.

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. त्यांच्या सभेचे चंद्रपूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. तर यवतमाळमधील काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत.

याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून सुरुवात होत आहे. त्यांची पहिली सभा बुलडाण्यात होणार आहे. तर साता-यातील राष्ट्रवादीचे उमेदवार उद्यनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची वाईमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व वातावरण ढवळून निघाले आहे.