भारतीयांनी घेतली १० लाख कोटी रूपयांची गृहकर्जे

मुंबई –  गतवर्षात म्हणजे २०१३ -१४ मध्ये भारतीयांनी बँका व अन्य वित्त संस्थांकडून  १.६० लाख कोटीं रूपयांचे गृहकर्ज घेतले असून  भारतीयांनी घेतलेल्या एकूण गृहकर्जाचा आकडा आता १० लाख कोटींवर गेला असल्याचे गृहकर्जांबाबत नियंत्रक म्हणून कार्यरत असलेल्या नॅशनल हौसिग बॅकेने जाहीर केले आहे.

एनएचबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. शर्मा या संबंधी माहिती देताना म्हणाले की, आगामी म्हणजे २०१४-१५ सालातही गृहकर्जाबाबत हाच ट्रेंड कायम राहील असे संकेत मिळत आहेत. फायनान्स कंपन्या आणि बँकांनी दिलेल्या कर्जात १९ टक्के वाढ झाली आहे. मार्च २०१३ पर्यंत ८ लाख कोटींची कर्जे दिली गेली होती त्यात २०१३-१४ मध्ये १.६० लाख कोटींची भर पडली आहे. गृहकर्ज देण्यात बँकांचा हिस्सा ६६ टकके इतका आहे.

नॅशनल हौसिंग बॅक  लवकरच अन्य बँकांच्या सहाय्याने हौसिग प्रोजेक्ट रेटिंग सुरू करत असून त्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी मागितली गेली आहे. यानुसार बांधकाम प्रोजेक्टना १ ते ७ असे रेटिंग दिले जाणार असून ७ रेटिंग असणारे प्रोजेक्ट सर्वश्रेष्ठ म्हटले जातील. या रेटिंग मुळे ग्राहकांना. योग्य निर्णय घेण्यास मदत मिळेल असेही ते म्हणाले.