दुबई – आगामी काळात सुरू होत आसलेल्या आयपीएलच्या सातव्या सीझनसाठीच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री आजपासून सुरू झाली आहे. भारतात लोकसभा निवडणुका आणि आईपीएल मॅचेस एकाच वेळेस आल्याने टूर्नामेंटच्या पहिल्या सत्रातील मॅच संयुक्त अरब आमिरातमध्ये (यूएई) आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांनतरचे सामने भारतात होणार आहेत.
थेट मैदानावर जाऊन आयपीएल मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक www.iplt20.com आणि www.ticketmaster.ae, वर तिकीट उपलब्ध होतील. याशिवाय, ६ एप्रिलपासून अबुधाबी, दुबई आणि शारजाहच्या लुलु हायपरमार्केटसच्या काही ठराविक स्टोअर्समध्ये तिकीट उपलब्ध होतील तर १० एप्रिलपासून स्टेडियमच्या बॉक्स ऑफिसवरही प्रेक्षक तिकीट प्राप्त करू शकतील.
अबुधाबीच्या मॅचसाठी तिकीटांची किंमत एका मॅचसाठी २० दिरहम (यूएई) आणि दो मॅचसाठी ३० दिरहम असेल. दुबईमध्ये एका मॅचसाठी ३० दिरहम आणि एकाच दिवसातील दोन मॅचसाठी ५० दिरहम असा तिकीटांचा दर असेल. शाहरजाहमध्ये तिकटांची किंमत एका मॅचसाठी ३० दिरहम आणि दोन मॅचसाठी ४० दिरहम अशी निर्धारीत करण्यात आली. पहिल्याच दिवशी तिकीट खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.