भाजप व मनसेची छुपी युती- मुख्यमंत्री

मुंबई- आागमी काळात होत असलेल्या व लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मनसेची छुपी युती असून त्यामुळे मतदारानी कॉग्रेसच्याा पाठीशी खंबीरपणे उभे राहवे असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री चव्हााण हे रायगड येथे आयोजीत करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना मुख्योमंत्री चव्हा्ण म्हसणाले, भाजपने २५ वर्षांच्या मैत्रीला विसरून आपला ज्येष्ठ सहकारी असलेल्या शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला आहे. केवळ राजकीय हेतू पाहून त्यां्नी मनसेला जवळ केले आहे. या दोघांमध्ये छुपी युती आहे. त्यामुळेच हे सर्व चालले आहे, असे म्हणत राज ठाकरे यांना लक्ष्य केले.

तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूना मतदारच आपली औकात दाखवतील, अशी टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी जळगावात केली. ही देशाची निवडणूक आहे मात्र ठाकरे बंधू एकमेकांची औकात काढून घरघुती भांडणच चव्हाट्यावर आणताहेत. यामुळे माध्यमांना मात्र चांगले खाद्य मिळाले आहे.जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आर. आर. पाटील यांनी जळगावात उपस्थिती दर्शवली होती.