मुंबई – खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक महिना ८ हजार रूपये प्राप्ती असलेल्या कुटुंबानाही गृहकर्जे उपलब्ध करून देणार आहे. अर्थात हे कर्ज कर्जफेडीची जोखीम लक्षात घेऊन सर्वसामान्य गृहकर्जांच्या तुलनेत थोडे जास्त व्याज आकारून दिले जाणार आहे असे समजते.

बँकेच्या कर्जविभागाचे प्रमुख जयराम श्रीधरन या संदर्भात माहिती देताना म्हणाले की सध्या बहुतेक सर्व गृहकर्जे देणार्या संस्था किमान २५ हजार कमाई असणार्या ग्राहकांनाच गृहकर्जे देतात. मात्र आम्ही ही योजना खास वर्गासाठीच सुरू केली आहे. आमची बँक महिना ८ हजार रूपये उत्पन्न असलेल्यांना १०.७५ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे. शहरी भागात २५ हजारापेक्षा अधिक कमाई असलेले ६० लाख परिवार आहेत तर १० ते २५ हजार रूपयांपर्यंत कमाई असलेली अडीच कोटी कुटुंबे आहेत.या कुटुंबाना घरासाठी कर्ज काढण्याचे मार्गच उपलब्ध नाहीत. त्यामुळे या वर्गासाठी आम्ही खासकरून ही योजना आणली आहे.