९४ वर्षांची लॉरा देतेय ड्रायव्हिंगचे धडे

ब्रिटनमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे ती ९४ वर्षांची लॉरा थॉमस. नातवंडे पतवंडे असलेली ही आजी आजही अनेकांना कार ड्रायव्हिंग कसे करावे याचे प्रशिक्षण देत आहे. तिच्याकडे शिकण्यासाठी इतकी गर्दी होते की अनेकांना वेळेअभावी नाही म्हणण्याची पाळी लॉरावर येते असे समजते.

वेल्समध्ये राहणारी लॉरा गेली ७६ वर्षे ड्रायव्हिंग शिकविते आहे आणि या काळात तिच्या हातून एकही अपघात झालेला नाही. आपल्या नातवंड पतवंडांनाही तिनेच ड्रायव्हींग शिकविले आहे. गाडी चालवायला तिला फारच आवडते. मेंदू सक्रीय असेल तर कोणत्याही वयात ड्रायव्हिंग करण्यास कांहीच अडचण येत नाही असे तिचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांना तिने ड्रायव्हिंगचे धडे दिले आहेत. विशेष म्हणजे तिच्याकडे शिकणारे सर्व ड्रायव्हिंग परिक्षेत पास झाले आहेत.

लॉरा सांगते १९३८ साली तिला भावाने नाताळची भेट म्हणून कार खरेदी करून दिली होती. तेव्हापासून ती गाडी चालविते आहे. आता त्या काळापेक्षा गर्दी वाढलीय, नव्या नव्या कार बाजारात आल्या आहेत पण ड्रायव्हिंगचे बेसिक्स बदललेले नाहीत. त्यामुळे आजच्या काळातही ड्रायव्हिंग शिकविण्यात कांहीच अडचण नाही असे तिचे म्हणणे आहे.

Leave a Comment