
मुंबई- कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ असलेल्या एका पार्किंगमध्ये आज (बुधवार) 16 जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. पार्किंगमध्ये 16 जिवंत काडतुसे आढळल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. काडतुसे ताब्यात घेण्यात आली असून, पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलवरही हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी 31 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यामध्ये परदेशी नागरिकांचा समावेश होता.
