सॅमसंगच्या शिनने अॅपलच्या कुकला टाकले मागे

दक्षिण कोरियन इलेक्ट्रोनिक जायंट सॅमसंगच्या मोबाईल बिझिनेसचे सीईओ जे.के.शिन यांना ५.८ दशलक्ष डॉलर्सचे कॉम्पेन्सेशन पॅकेज गतवर्षी दिले गेले असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे त्यांची प्रतिस्पधी कंपनी अॅपल चे सीईओ टिम कुक याला शिन यांनी कमाईत मागे टाकले आहे. साऊथ कोरियन फायनान्स अॅथॉरिटीने केलेल्या नव्या नियमानुसार लिस्टेट कंपन्यांनी वार्षिक कॉम्पेन्सेशनचा तपशील त्यातही प्रमुख अधिकार्‍यांचा तपशील जाहीर करणे बंधनकारक केले आहे. ५०० दशलक्षांपेक्षा जास्त कॉम्पेन्सेशन मिळणार्‍या अधिकार्‍याचा या संदर्भातला तपशील जाहीर करण्यात आला आहे.

या तपशीलानुसार शिन यांचा बेस पगार १.१७ अब्ज डॉलर्स असून त्याना १.६ अब्ज डॉलर्स बोनस म्डरून दिले गेले आहेत. अॅपलच्या टीम कुकला २०१३ मध्ये ४.२५ दशलक्ष डॉलर्स कॉम्पेन्सेशन म्हणून दिले गेले होते. शिन यांनी मोबाईल विभागाची सूत्रे २००९ मध्ये हातात घेतली आहेत आणि त्यांच्या गॅलॅक्सी मालिकेतील हँडसेटना ग्राहकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कंपनीच्या महसूलात लक्षणीय वाढ झाली आहे असे समजते.