या कुटुंबाच्या खातीरदारीत गुंतलेत अवघे राजकीय पक्ष

पाटणा- निवडणुका जवळ येत चालल्या आहेत आणि त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी वाढतच चालली आहे. मतदारांना सर्व प्रकारे आपल्याच पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांत होड लागलेली दिसत आहेच पण त्याचवेळी बिहारच्या किशनगंज मतदारसंघातील एका कुटुंबाकडे सर्व प्रमुख राजकीय पक्ष जरा अधिकच लक्ष पुरविताना दिसून येत आहे.

या मतदारसंघातील पूर्णिया जिल्ह्यात असलेलल्या जियागाछी हे गांव लहानसे खेडे असले तरी येथे सर्व राजकीय पक्षांचे पुढारी आणि नेते येथील मोहम्मद नजीर यांच्या कुटुंबाशी सतत संपर्कात आहेत. याचे कारण म्हणजे बिहारमधील हा सर्वात मोठा कुटुंबकबिला असून या कुटुंबात ८५ सदस्य आहेत आणि त्यातील ४७ मतदार आहेत. या कुटुंबात ३० मुले, ३० महिला,५५ पुरूष असून ते सर्व एकच छताखाली राहात आहेत.

मोहम्मद नसीर यांची भावजय या गावची सरपंच आहे. हा परिवार गावातील किरकोळ भांडणे, वाद सोडविण्यास पोलिसांना मदत करत असतो. मात्र आता मतदानाचे दिवस जवळ येत चालल्याने या परिवाराकडे जरा अधिकच लक्ष दिले जात असून मोहम्मद सांगतात की आमच्याही अपेक्षा आता वाढल्या आहेत. आमच्याही कांही मागण्या या निमित्ताने आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. कारण आमची एकगठ्ठा ४७ मते आम्ही देणार आहोत. या मतदारसंघात मुस्मीम मतदारांची टक्केवारी आहे ६६.७ ट्क्के.

Leave a Comment