आता आवाजही करता येणार दान

अवयव दानाबाबत नागरिकांत आता बर्‍यापैकी जागृती झाली आहे. अवयव दानात आता एक पाऊल पुढे पडू शकेल असा शोध नॉर्थवेस्ट विद्यापीठातील प्रो.रूपल पटेल व त्यांचे सहकारी टिम बनेल यांनी लावला आहे. त्यांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे आता कुणीही आपला आवाजही दान करू शकणार आहेत. हा दान केलेला आवाज जे बोलू शकत नाहीत किवा आजारपणामुळे ज्यांना बोलणे अशक्य बनले आहे अशा रूग्णांना कृत्रिम आवाज पुरवू शकणार आहे.

त्यासाठी इच्छुक व्यक्तीला दोन तीस तास त्यांचा आवाज रेकॉर्ड करावा लागेल. त्यात अधिकाधिक शब्द वापरावे लागतील कारण जितके शब्द जास्ती तितकी आवाज अधिक प्रभावी बनेल. हे आवाज ज्याला पुरवायचे त्या व्यक्तीचे लिंग, वय, आणि शरीराचा आकार पाहून त्याप्रमाणे आवाजाची पातळी ठरविली जाते. हे आवाज फिंगरप्रिट प्रमाणे वेगवेगळेच असतील. व्यक्ती त्याच्या पसंतीचा आवाज निवडू शकेल. कृत्रिम आवाजाच्या मदतीने आवाज घेणारी व्यकती त्याला काय म्हणायचे आहे ते सांगू शकणार आहे.