सोन्याची फेरारी

हौसेला मोल नाही ही उक्ती इराकचा किक बॉकिसंगपटू रियाध अल अज्जावी याने सार्थ ठरविली आहे. जागतिक विजेता असलेल्या अज्जावीने आपली दोन कोटी रूपयांची ४५८ स्पायडर फेरारी चक्क सोन्याच्या पत्र्याने मढविली आहे. अज्जावी केसिग्टन येथील जिमबाहेर आपली गाडी पार्क करून व्यायाम करण्यासाठी गेला तेव्हा त्याची ही सोन्याची फेरारी पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली हेाती.

या गाडीला सोन्याचा पत्रा लावण्यासाठी अज्जावीने ४ लाख रूपये खर्च केले आहेत. इटालियन  फेरारी ४५८ स्पायडर हे मॉडेल सर्वाधिक चर्चेत असलेले मॉडेल असून ही गाडी ३.४ सेकंदात १०० किमीचा वेग गाठू शकते.