
जालना – शेतकरी आत्महत्यांवरून लक्ष्य करणाऱ्या नरेंद्र मोदींवर रविवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तीव्र शब्दांत बरसले. ‘काँग्रेसमुक्त भारत निर्माण करण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे डोके फिरले आहे. निवडणुका संपल्यावर त्यांच्यावर चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण उपचार करू,’ असा शब्दांत त्यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून देशभर फिरत आहेत. मात्र, त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत, अशीही टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, अन्नसुरक्षा कायदा लागू झाला असला, तरी आपण जोपर्यंत सत्तेत आहोत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव पडू देणार नाही.
