दिल्ली – भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून सत्तेचे चान्सेस अधिक दिसत आहेत. त्या पाश्वभूमीवर मोदी सत्तेत आले डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत होऊन त्याचा दर डॉलरला ४० ते ४५ रूपयांवर स्थिरावेल असे सिटीग्रूपचे आशिया पॅसिफिक करन्सी विभागाचे प्रमुख अॅडम गिलमोर यांचे म्हणणे आहे.
गिलमोर यांच्या मते नरेंद्र मोदी सत्तेत येण्याची संधी अधिक असल्याचे सध्याची सर्वेक्षणे दाखवित आहेत. त्याचा परिणाम रूपया डॉलर दरावर आत्ताच जाणवू लागला आहे. गेल्या २८ ऑगस्ट ला रूपयाने डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळी गाठली होती व तो डॉलरला ६८.८० पैशांवर गेला होता. मात्र सध्या कोणतीही विशेष उपाययोजना न करताही रूपयाचे मूल्य वाढत चाललेले दिसते आहे. विशेष म्हणजे बँका आणि आयातदार यांच्याकडून डॉलरला वाढती मागणी असतानाही आज रूपया ६१.३६ वर आहे. मोदी सत्तेत आले तर तो डॉलरच्या तुलनेत ४० ते ४५ रूपयांवरच स्थिरावेल असेही त्यांचे म्हणणे आहे.