सानिया मिर्झा – कारा ब्लॅक दुस-या फेरीत

मियामी, – सोनी ओपन टेनिस स्पर्धेत भारताची आघाडीची टेनीसपटू सानिया मिर्झा आणि तिची दुहेरीतील साथीदार कारा ब्लॅक यांनी दुसर्याल फेरीत प्रवेश मिळविला. या स्पझर्धेत दुसरीकडे लिएंडर पेस आणि रॅडेक स्टेपानेक यांची जोडी मात्र पहिल्याच फेरीत बाद झाली. आता सानिया मिर्झा व कारा ब्लॅक यांच्याा खेळीकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेतील भारताच्यार पुरुष गटातील आव्हान रोहन बोपन्ना आणि महेश भूपती यांच्या रूपाने शिल्लक आहे.

सोनी ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया आणि काराने दमदार खेळी करताना तैपेईच्या हाऊ चिंग चान आणि युआन जान चान यांचा ६-३, ६-७ आणि १०-८ च्या फरकाने पराभव केला. आगामी काळात आता त्यांची लढत जॉर्जियाच्या ओकसाना के. आणि रशियाच्या एलिसा क्लेबानोव्हा या जोडीशी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे भारताचा अव्वल टेनीसपटू पेस आणि स्टेपानेक जोडी ही वर्षभरात खेळल्या गेलेल्या पाचपैकी तीन स्पर्धांच्या पहिल्याच फेरीत गारद झाली आहे. पुरुष गटात लिएंडर पेस आणि रॅडेक स्टेपानेक यांना अमेरिकेच्या एरिक बुटोरॉक आणि रॉवेन क्लासेन यांच्याकडून मात खावी लागली. त्यां ना ६-३, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पेस-स्टेपानेक या जोडीचा पराभव झाला. यापूर्वी पेस आणि स्टेपानेक जोडी चेन्नई आणि सिडनी येथे झालेल्या स्पर्धांच्या पहिल्या फेरीतूनच बाहेर पडली होती. या स्पर्धेतील भारताच्यार पुरुष गटातील आव्हान रोहन बोपन्ना आणि महेश भूपती यांच्या रूपाने शिल्लक आहे.

Leave a Comment