पुणे – मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्रे बाळगल्याबद्दल कैद भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त तीन महिन्यांचा पॅरोल संपवून आज सायंकाळपर्यंत येरवडा मध्यवर्ती कारागृहात परतणार असल्याचे वृत्त आहे. ख्रिसमस आणि होळीचा सण कुटुंबियांसमवेत साजरा केल्यानंतर तो आता परत येत आहे.
पत्नी मान्यता गंभीर आजारी असल्याचे कारण सांगून संजय दत्त २१ डिसेंबरपासून पॅरोलवर तुरूंगाबाहेर आहे. त्याने पॅरोल अजून वाढविण्याची केलेली मागणी फेटाळण्यात आल्यानंतर तो जेलमध्ये परतत आहे. कोणत्याही कैद्यांला जेलच्या निवमानुसार ९० दिवसांपेक्षा अधिक पॅरोल देता येत नाही. संजयला वारंवार मंजूर करण्यात आलेल्या पॅरोलमुळे जेल व्यवस्थापनावर टीकेची झोड उठविली गेली होती आणि प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले होते. गुन्हेगार ठरल्यानंतरही संजयला दिली जात असलेली विशेष सूट हाच टीकेचा मुख्य विषय होता.