
मुंबई – भाजपने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिल्यामुळे, त्यांचे वडील व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कळविल्यावर त्यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली.
