इन्फोसिसचा व्होल्व्हो बरोबर दीर्घकालीन करार

सॉफ्टवेअर क्षेत्रातील देशातील अग्रणी इन्फोसिस कंपनीने व्होल्व्हो कार कंपनीबरोबर अॅप्लिकेशन विकास करार केला असून दीर्घकाळासाठी हा करार केला गेला आहे. या करारापोटी कंपनीला किती रक्कम मिळणार याचा खुलासा मात्र केला गेलेला नाही.

या विषयी माहिती देताना इन्फोसिस (युरोप) चे उपाध्यक्ष नितेश बंसल म्हणाले की २०१० पासूनच कंपनी व्होल्व्होला सॉफ्टवअर अॅप्लिकेशन सेवा देत आहे. आता आम्ही त्यांच्यासाठी उपयुक्त अशा मार्केटिंग, ग्राहक सेवा, विक्री, उत्पादन विकास यासाठीची अॅप्लीकेशनही देणार आहोत. कार्पोरेट कामासाठीही इन्फोसिस व्होल्व्होला सहकार्य करणार आहे.