परदेशी पर्यटकांसाठी पोल टूरिझम

मुंबई –  जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूकीचा ज्वर चढू लागला असतानाच ट्रॅव्हल कंपन्यांनी पोल टूरिझम ही नवी संकल्पना अमलात आणली असून अक्षर ट्रॅव्हल्सने त्यासाठी देशभरातील प्रवासी कंपन्यांशी संपर्क साधला असल्याचे वृत्त आहे. प्रवासी वाढावेत आणि व्यवसाय जोरात व्हावा यासाठी ही संकल्पना राबविली जात असून परदेशी पर्यटकांना भारतातील निवडणुकांची चव चाखता यावी असाही त्यामागे उद्देश आहे. या साठी विशेष पॅकेज तयार केली गेली आहेत आणि अनेक देशांतील पर्यटकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.

अक्षर ट्रॅव्हल्सचे प्रमुख मनोज शर्मा गुजराथ टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्षही आहेत. पोल टूरिझम विषयी बोलताना ते म्हणाले की आम्ही देशातल्या ६० प्रवासी कंपन्यांशी बोलणी केली आहेत तसेच पॅरिस, अॅमस्टरडॅम, दुबई, आबुधाबी, लंडन, बिजिग, टोकियो शहरातूनही प्रतिसाद मिळत आहे. ही कल्पना बर्लीन येथे झालेल्या टूरिझम परिषदेत प्रथम मांडली गेली. या परिषदेला १०० देशातील प्रवासी कंपन्या, हॉटेल्स, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते व तेव्हापासून आत्तापर्यंत ८०० एन्क्वायरी आल्या आहेत.

पोल टूरिझमसाठी कांही पॅकेज असून त्यात दिल्ली, जयपूर, आग्रा अशा प्रकारची पॅकेज आहेत. यात निवडणूकांचा माहोल अनुभवणे, राजकीय नेत्यांबरोबर चर्चा भेटी, रॅलीजना उपस्थिती लावणे पर्यटकांना शक्य होत आहे. प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान पाहण्यासाठी निवहणूक आयोगाकडून परवानगीही मागितली गेली आहे. इजिप्त, गल्फ या देशातून लोकशाही मार्गाने होणार्‍या निवडणुका म्हणजे काय याची कल्पना नसते त्यामुळे तेथील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद आहे तसेच सिंगापूर, युक्रेन, लंडन, बिजिंगमधूही पर्यटकांनी प्रतिसाद दिला आहे.

Leave a Comment