गुगलचा चार कॅमेरेवाला थ्रीडी मॅपिंग स्मार्टफोन

गुगलने थ्रीडी मॅपिंग स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी चालविली असून या फोनला चार कॅमेरे दिले जात आहेत. यामुळे चोहोबाजूंची दृष्ये रेकॉर्ड करणे शक्य होणार आहे. स्मार्टफोनची व्याख्या बदलणारा हा फोन असेल असेही सांगितले जात आहे. टँगो असे या प्रकल्पाचे नामकरण केले गेले आहे.

या फोनमध्ये ४ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा,१८० डिग्री फिरणारा फिश आय कॅमेरा, डेप्थ ऑफ फिल्ड कॅमेरा आणि १२० डिग्रीचा फ्रंट व्ह्यू कॅमेरा असे चार कॅमेरे असतील. अँड्राईड ऑपरेटेड हा स्मार्टफोन गुगल मॅपिग आणि स्ट्रीट व्ह्यू या वैशिष्टयांसह बाजारात आणला जाणार आहे.