एप्रिल मध्ये ९५ टक्के एटीएम हॅक होण्याचा इशारा

नवी दिल्ली- विंडोज एक्सपीचा सपोर्ट मायक्रोसॉफ्टकडून ८ एप्रिलाला संपविला जाणार असल्याने जगातील ९५ टक्के एटीएम तसेच संगणक आधारित इंडस्ट्रीयल कंट्रोल सिस्टिम हॅक होतील असा इशारा सुरक्षा संस्थांनी दिला आहे. मायक्रोसॉफ्टचा सपोर्ट संपताच हॅकर्स सर्वप्रथम विडोज एक्सपी सिस्टिीम हॅक करतील कारण ती हॅक करणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे जगभरातील ९५ टक्के एटीएम मशीन्ससाठी विंडोज एक्सपीच वापरात आहे. यामुळे हॅकींग आणि व्हायरसचा धोका वाढणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

विंडोज एक्सपी २००१ मध्येज रिलीज करण्यात आले आणि अजूनही खूप कंपन्यांत त्याचा वापर सुरू आहे. अपग्रेडेशनचा खर्च अधिक असल्याने अनेक कंपन्यातून हीच सेवा वापरात ठेवली गेली आहे. मात्र अपग्रेडेशन वेळेवर न केले गेल्यानेच हॅकरना या साईट हॅक करणे सोपे बनले आहे असे सुरक्षा तज्ञांचे मत आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज एक्सपीचा सपोर्ट थांबविणार असले तरी विंडोज ७, ८ व विस्टाचा सपोर्ट सुरू ठेवणार आहे.

मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर टिमोथी रेन्स यांनीही विंडोज ७, ८ व विस्टाचा वापर करून विंडोज एक्सपीवर हल्ला करणे १०० टक्के शक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. याचा फटका गरीब देशांना मोठ्या प्रमाणावर बसेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment