
इंडियन प्रीमियर लीगच्या 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे, पण त्याआधी बंगळुरूचे दोन मॅच विजेते खेळाडू एकमेकांशी भिडले. आम्ही बोलत आहोत विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्याबद्दल, जे नेटमध्ये एकमेकांशी भिडले. अहो काळजी करू नका, ही खरी लढत नसून बॉल आणि बॅटची लढत होती.
Watch Video : एकमेकांना भिडले विराट कोहली-मोहम्मद सिराज, झाली जोरदार ‘हाणामारी’, काय घडले सामन्यापूर्वी ?
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांनी नेटमध्ये घाम गाळला. दोन्ही खेळाडूंनी आपले कौशल्य अधिक धारदार करण्याचा प्रयत्न केला. या तयारीदरम्यान दोघेही आमनेसामने दिसले. आरसीबीने या लढतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
विराट कोहलीला सर्वप्रथम मोहम्मद सिराजने त्रास दिला होता. सिराजने त्याला आधी आऊट स्विंगवर आऊट केले आणि नंतर त्याने एक चेंडू स्विंग केला, त्याची हवा देखील विराट कोहलीला लागली नाही. खुद्द विराट कोहलीनेच अशी प्रतिक्रिया दिली की जणू सिराजच्या या चेंडूला त्याच्याकडे उत्तरच नाही.
सिराजने विराटला नक्कीच फसवले, पण त्यानंतर विराटने त्याची मजाही लुटायला सुरुवात केली. विराटने सिराजच्या चेंडूंवर झटपट फटके खेळले. सिराजच्या चेंडूंवर कट, पुल, ड्राईव्ह असे सर्व प्रकारचे फटके लागले. व्हिडीओमध्ये सिराज म्हणत होता की, जोपर्यंत चेंडू नवीन होता तोपर्यंत त्याला मदत मिळते, पण जुना होताच विराटने अप्रतिम फलंदाजी केली. विराटला जुन्या चेंडूवर रोखणे खूप अवघड असल्याचे सिराजने मान्य केले.
आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि मोहम्मद सिराज या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. सिराजने 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. तर विराटने 46 पेक्षा जास्त सरासरीने 279 धावा केल्या आहेत. आरसीबी संघाला या दोन खेळाडूंकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. विशेषत: गेल्या सामन्यात आरसीबीचा 61 धावांनी पराभव करणाऱ्या केकेआरविरुद्ध.
