मुंबईत केजरीवालने केला रिक्षातून प्रवास

मुंबई: मुंबई शहरात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे बुधवारी सकळी दाखल झाले आहेत. आप कार्यकर्त्यांनी विमानतळावर अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर रिक्षाने अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत फेरफटका मारून प्रचाराला सुरुवात केली आहे.

मुंबई येथील विमानतळावर आगमन झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा बसून अंधेरी रेल्वे स्थानकाकडे कूच केली आहे. पुढे पोलिसांची गाडी आणि मागे रिक्षांचा असा चित्र मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे. मात्र या प्रवासादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसत आहे. अनेक कार्यकर्ते रिक्षाला लटकून प्रवास करत होते. त्या मुळे काही काळ मुंबईतील वाहतुकीला याचा अडथळा निर्माण झाला होता.

मुंबईत होणा-या या एक दिवसाच्या दौ-यात केजरीवाल यांचे भरगच्च कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणुकासाठी रिंगणात असलेल्या मीरा संन्याल आणि मेधा पाटकर यांचा प्रचार यावेळी केजरीवाल हे करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच इतरही अनेक सभा आणि भेटीगाठी केजरीवाल घेणार आहेत. तर संध्याकाळी रोड शो आणि प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे एक दिवसातच विविध कार्यक्रमाच्या माध्याामातून ते शहर पिंजून काढणार आहेत.