
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे ३१ मार्च २०१४ पर्यंत २० हजार एटीएम मशीन्स बसवावी लागणार आहेत. २०१३ च्या अंदाजपत्रकात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रत्येक शाखेत १ एटीएम बसविण्यासाठीची तरतूद केली गेली होती. त्यानुसार या क्षेत्रातील २६ बँकांच्या ७२३४० शाखांत ही मशीन्स बसविणे आवश्यक होते. मार्च २०१३ मध्ये ३७६७२ एटीएम मशीन्स बसविली गेली होती तर डिसेंबर १३ पर्यत १४८५५ मशीन्स बसविली गेली. तरी अद्यापी १९३८१ मशीन्स बसविण्याचे काम बाकी आहे.
