पाकिस्तानातही आम आदमी पार्टी

इस्लामाबाद- भारतात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला लाभलेली लोकप्रियता आणि दिल्ली निवडणूकात पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मिळविलेले यश यामुळे प्रेरित झालेल्या गुजरनवाला येथील कार्यकर्ते असलन उल मुल्क यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली असून पाकिस्तानच्या निवडणुक आयोगाकडे त्याची नोंदणी केली असल्याचे समजते.

पक्षाचे अध्यक्ष मुल्क सांगतात की पाकिस्तानचे प्रेरणास्थान कायदेनवाझ मोहम्मद अली जिना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान प्रत्यक्षात आणणे हा आमच्या पक्षाचा अजेंडा आहे. विशेष म्हणजे मुल्क हेही केजरीवाल यांच्याप्रमाणे आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग अवलंबित आहेत. सध्या सुरू असलेल्या पंजाब राज्याच्या अधिवेशन काळात मुल्क यांनी पंजाब विधानसभेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. पोलिस दलातील सुधारणा आणि छळवाद विरोधी बिल पास केले जावे यासाठी ते हे उपोषण करणार आहेत.