
कोल्हापूर – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सांगली आणि कोल्हापूर येथे सभा घ्यावी यासाठी नेते चंद्रकांतदादा पाटील प्रयत्नशील असल्याचे समजते. कोल्हापूरातून गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले सदाशिवराव मंडलीक यांचा मुलगा संजय मंडलिक यांना यावेळी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे तर सांगलीत राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने संजयकाका यांना उतरविले आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी भागात गुजराथी, सिंधी, जैन, उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि मोदींची सभा येथे झाली तर युतीला मोठाच फायदा मिळू शकणार आहे असे सांगितले जात आहे.
