हजाराची नोट छापण्यासाठी ३ रूपये खर्च

दिल्ली – भारतातील चलनी नोटा छापण्यासाठी रिझर्व्ह बँकेला किती खर्च येतो याची माहिती माहिती अधिकाराच्या हक्कातून आता उपलब्ध झाली आहे. या माहितीसाठी करण्यात आलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरानुसार १ हजार रूपयांची नोट छापण्यासाठी २ रूपये ९६ पैसे खर्च येतो तर १० रूपयांची नोट छापण्यासाठी ७५ पैसे खर्च येतो असे समजते.

बंगलोर येथील नोट मुद्रण प्रा. लिमिटेड यांच्याकडून ही माहिती मागितली गेली होती. त्यानुसार विविध किमतीच्या नोटांच्या छपाईसाठी वेगवेगळा खर्च येतो. पाचशे रूपयाच्या नोटेसाठी २ रूपये ८६ पैसे. २० रूपयांच्या नोटेसाठी १ रूपया.५० रूपयांच्या नोटेसाठी दीड रूपया असा खर्च येतो. २०१३ मध्ये येथे १,२ व पाच रूपयांच्या नोटा छापल्याच गेलेल्या नाहीत असेही या माहितीतून स्पष्ट झाले आहे.