गडकरींपूर्वी मुंडेनी घेतली होती राज ठाकरेंची भेट

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता गडकरींपूर्वी खासदार गोपीनाथ मुंडेनीदेखील राज ठाकरेंची भेट घेतल्‍याचे बातमी प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. मुंडे यांनी राज ठाकरे यांची पुण्यात एका उद्योगपतीच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते.

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मनसेअध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. मनसेने लोकसभा निवडणूक लढवू नये आणि महायुतीत सामील व्हावे अशी ऑफर गडकरींनी राज ठाकरेंना दिली होती. राज ठाकरेंनी ही ऑफर नाकारली आहे.

राज ठाकरेंची भेट घेतल्याने नाराज झालेल्याा शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या जिव्हारी ही भेट लागली होती. गडकरी यांना चिमटे काढतानाच महायुती तोडण्याची धमकीही शिवसेना नेतृत्वाने दिली होती. यापुढे महायुतीतील सर्व निर्णय गोपीनाथ मुंडेसोबत चर्चा करुन घेतले जातील अशी घोषणा उध्दव ठाकरेंनी गडकरींना डावलण्याचा प्रयत्न केला. मात्र गडकरींपूर्वीच पुण्यातील एका उद्योजकाच्या निवासस्थानी घेतलेल्या या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही पण भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यालत आली होती. त्यामुळे आता शिवसेना यावरून काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment