कोल्हापूर: आगामी काळात होत असलेली लोकसभा निवडणुक आतापासूनच रंगात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नाही. राष्ट्रवादीला याठिकाणी तगडा उमेदवारच मिळत नसल्यपने ही जागा सोडण्याची नामुष्की त्यां च्यांवर ओढावली आहे. त्याणमुळेच आगामी काळात हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याडचे राष्ट्रवादीने ठरविले असल्या चे समजते.
लोकसभा निवडणूकीसाठी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसमध्येष २२-२६ असा फॉर्म्युला ठरला आहे; तरी आगामी काळात राष्ट्रवादी केवळ २१ च जागा लढवणार असल्याेचे समजते. हातकणगले येथून उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्र्वादी कॉग्रेसने हा मतदारसंघ सोडण्या चा निर्णय घेतला असल्या चे समजते; लोकसभा निवडणूकीसाठी सक्षम उमेदवार नसल्याने पहिल्यांदाच लोकसभा मतदारसंघ सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
हातकणगले या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील हे उत्सुक नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेसचे कलाप्पाण्णा आवाडे यांना येथे संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगमी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.