पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार

नवी दिल्ली – सरकारने शुक्रवारी संध्याकाळी प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात ६० पैशांची तर, प्रतिलिटर डिझेलच्या दरात ५० पैशांची वाढ केली. मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात येणार आहे.

पेट्रोलची वर्षातील ही दुसरी वाढ असून, जानेवारी २०१३ पासून डिझेलच्या दरातील ही चौदावी वाढ आहे. स्थानिक कर आणि व्हॅटचा या दरवाढीमध्ये समावेश नाही. त्यामुळे प्रत्येक शहरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असणार आहेत.

चार जानेवारीला पेट्रोलच्या दरात ९१ पैशांनी वाढ झाली होती. सध्या मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८१.३१ आहे. नवीन दरानुसार पेट्रोल ८२.०७ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत प्रतिलिटर डिझेलचा दर ६३.२३ आहे. नव्या दरानुसार डिझेल ६३.८६ रुपयांना मिळणार आहे.