मुंबई: सर्वत्र शुक्रवारी व्हॅलेंटाईन डेची गडबड सुरु आहे. युवक मंडळी हा दिन उत्सापहाने साजरा करीत आहेत. या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवशीच मुंबईतील वातावरणही रोमॅण्टिक झालेले आहे. मुंबईतल्या काही भागात शुक्रवारी सकाळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याटने येथील वातावरण देखील रोमँटिक झाले आहे.
मुंबई शहरातील बोरिवली, बांद्रा, जुहू परिसरात शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तसेच नवी मुंबईतही काही ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा आणि मातीचा सुगंध, असं काहीसे रोमँटिक वातावरण मुंबई शहरात पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी व्हेलेंटाईन डे.. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस….आज जगभरात हा दिवस साजरा केला जातोय. प्रेम व्यक्ति करायला कोणत्याही वयाचं बंधन नसतं… त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच हा दिवस साजरा केला जातोय. बाजारपेठा गुलाबांच्या फुलांनी सजल्यात तर आर्चिज आणि इतर दुकानात अनेक प्रकारच्या भेटवस्तू विक्रिसाठी सज्ज आहेत. आज प्रेमाचा लाल रंग मॉलपासून निरनिराळ्या दुकानात खुललेला पाहायला मिळत आहे.