बिजिग – चीनने २०१३ नंतर प्रथमच सोने खरेदीचा उच्चांक नोंदविला असून आत्तापर्यंत ११७६.४ टन सोने खरेदी केले आहे. गतवर्षी हाच आकडा ८३२.२ टन इतका होता असे चायना गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. यामुळे चीनने सलग सातव्या वर्षी सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश हा विक्रम कायम राखला आहे.
चीनमध्ये सोने खरेदीचे प्रमाण वाढत असले तरी सोने खरेदी आणि गोल्ड आऊटपूट याचे प्रमाण व्यस्त आहे. २००७ सालात चीनमध्ये ३२७.६ टन सोने खरेदी झाले होते मात्र त्याचा आऊटपुट २७०.५ टन इतका होता. २०१३ मध्ये मात्र हेच प्रमाण ११७६.४ टन खरेदी आणि ४२८.२ टन आउटपुट असे आहे. या विषयी सोने बाजार तज्ञ झिओ ली यांच्या म्हणण्याप्रमाणे चीनमध्ये सोन्याचे दागिने आणि लगडी यांना अधिक मागणी आहे. सोन्याच्या किमती घसरल्यानंतर सर्वसामान्यांकडून होणारी खरेदी वाढली आहे. चीनच्या बाजारात दागिने क्षेत्रात आजही मोठी संधी उपलब्ध आहे.